Prarambhik Tabla Exam Syllabus अ.भा.गांधर्व विद्यालय मंडळाचा अभ्यासक्रम
तबला (प्रारंभिक)परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम व महत्त्वपूर्ण व्याख्या.
***************************************
🙏तालांचा टाळी वर व तबल्यावर वाजून व्हिडिओ🙏
https://youtu.be/gFE5jj7NBnk
https://youtu.be/o8zCLF78Ky4
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
***************************************
क्रियात्मक : ४०
पूर्णांक : ५०
न्यूनतम : १८
शास्त्र मौखिक रूप में :
शास्त्र (मौखिक) : १०
१) निम्नलिखित शब्दों की परिभाषा: मात्रा, ताल, सम, ताली, खाली, विभाग, दुगुन, आवर्तन.
क्रियात्मक :
१) अपने वाद्य पर बजने वाले सभी प्रमुख स्वतंत्र वर्णो के वादन विधि का समुचित ज्ञान।
२) अ) निम्नलिखित सभी तालों को ठाह तथा दुगुन में हाथ से ताली, खाली दिखाकर बोलने
की तथा बजाने की क्षमता।
१) तबला : त्रिताल, झपताल, दादरा तथा कहरवा
२) पखवाज : आदिताल, चौताल तथा सूलताल।
ब) रूपक / तीव्रा ताल को बराबर की लय में बोलने की तथा बजाने की क्षमता।
३) निम्नलिखित तालों में विस्तार
तबला : अ) त्रिताल : एक 'तिट' का एवम 'तिरकिट' का कायदा, तीन पलटे तिहाई सहित
ब) त्रिताल और झपताल में सम से सम तक न्यूनतम एक एक तिहाई
पखवाज : चौताल में धागेतिट तथा धूमकिट बोलयुक्त रचना प्रकारों का बराबर की लय
में वादन।
****************************************
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🌺प्रवेशिका प्रथम वर्ष संपूर्ण व्याख्या.🌺
प्रकरण १ व्याख्या
१) संगीत
'गायन, वादन व नृत्य' या तीन कलांच्या सुंदर संगमास संगीत असे म्हणतात. किंवा 'गीतम्, वाद्यम् तथा नृत्यम् त्रयं संगीत मुच्छती
२) नाद
'नियमित आणि स्थिर आन्दोलन संख्या असलेल्या मधुर ध्वनीस नाद असे म्हणतात.' किंवा 'संगीत उपयोगी मधुर ध्वनीस नाद असे म्हणतात.'
३) स्वर
कायम उंचीच्या, अखंड टिकणाऱ्या व कानास मधुर वाटणाऱ्या रंजक नदास स्वर असे म्हणतात.
४) लय
ज्या गतीमध्ये मात्रा चालतात त्या गतीस लय असे म्हणतात. किंवा दोन मात्रांमधील विश्रांतीस लय असे म्हणतात.
5) बोल:
तबला वादन करताना जे शब्द वापरले जातात त्या शब्दांस बोल असे म्हणतात.
उदा. धा, धि, तिट तिरकिट, त्रक इ. अक्षरांना बोल असे म्हणतात.
6) ठेका
तालाचे विभाग, टाळी व कालानुसार ज्या प्रमुख बोल समुदायाची रचना केली जाते त्यास ठेका असे म्हणतात. किंवा तालाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी तबला किंवा मृदंगाचे बोल घेऊन जी मूळ रचना केली जाते त्या रचनेस ठेका असे म्हणतात.
उदा.
धा धिना धातीं ना हा दादरा तालाचा ठेका आहे.
७) किस्म
तालाचा ठेका अनेक प्रकारे वाजविला जातो त्या प्रकारालाच किस्म असे म्हणतात. उदा. धाते धिना गिना । धाते तिना किना हा दादरा या तालाचा किस्म आहे.
8 ) कायदा:
तालाच्या विभागानुसार टाळी व कालाचे स्वरूप प्रदर्शित करीत तयार केलेली विस्तारक्षम रचना म्हणजे कायदा होय.
उदा. धा धा तिट धा धा तूं ना ता ता तिट धा धाधिना।
9) मुखडा
समेवर येण्यासाठी दुगुन अथवा चौगुन लयीत बांधलेली आकर्षक रचना म्हणजेच मुखडा होय. किंवा ठेक्याच्या कुठल्या तरी मात्रेपासून समेवरयेण्यासाठी व समेचे सौंदर्य वाढविण्यासाठी तयार केलेल्या सुंदर बोल समुदायास मुखडा असे म्हणतात. उदा. तीनतालाचा तेराव्या मात्रेपासूनचा मुखडा
१०) तिहाई :
जेव्हा एखादा बोल समुदाय तीन वेळा वाजून त्या बोलाचा अखेरचा 'धा' समेवर येतो तेव्हा त्यास तिहाई असे म्हणतात.
११) तिगुन
जेव्हा एखादा ताल एकाच आवर्तनात तीन वेळा वाजविला जातो किंवा : म्हटला जातो तेव्हा त्यास तिगुन असे म्हणतात. उदा. सहा मात्रांच्या कालावधीत तीन वेळा दादरा हा ताल वाजविला तर ती
दादरा तालाची तिगुन होईल.
१२) चौगुन
जेव्हा एखादा ताल एकाच आवर्तनात चार वेळा वाजवला अथवा : म्हटला जातो त्यास चौगुन असे म्हणतात. उदा. सहा मात्रांच्या एक आवर्तनात चार वेळा दादरा (२४ मात्रा) वाजविल्या तर ती दादरा तालाची चौगुन होईल.
१३) तुकडा
समेवर येण्यासाठी वाजविल्या जाणाऱ्या सुंदर तिहाईदार रचनेस तुकडा असे म्हणतात. हा तुकडा कमीत कमी एक आवर्तनाचा असतो तर जास्तीत जास्त तीन आवर्तनांचा असतो.
**************************************
तबल्याच्या अंगाचे वर्णन :
अवनध्द वाद्यांमध्ये लोकप्रिय असलेले वाद्य म्हणजे तबला. हे वाच तबला व डग्गा या दोन वाद्यांचे मिळून बनले आहे. तबल्याला दायाँ तर डग्ग्याला बायाँ असे म्हणतात. सर्वप्रथम आपण तबल्याच्या विभिन्न अंगाचे वर्णन पाहू या.
अ) तबला :
1) खोड:
सिसम, सागवान, खैर, बिजासाग, फणस, आंबा अशा झाडाच्या बुंध्यापासून तबल्याचे खोड बनवितात. याचा आकार वरच्या बाजूने निमुळता होत गेलेला असतो. वरील भागाचा व्यास ६" (इंच) असतो तर खालचा भाग ९" चा असतो. या खोडाची उंची साधारणपणे १ फुटाची असते. हे खोड आतून कोरलेले असते.
2) पुडी:
तबल्याचे मुख ज्या चामड्याने मढवलेले असते त्यास पुडी असे म्हणतात. ही पुडी बकऱ्याच्या दोन चामड्यांपासून बनवलेली असते. ही चामडी कमावलेली असते. पुडीवर शाई, लव व चाट इ. भाग असतात.
3) शाई :
लोखंडाचे चूर्ण, सरस किंवा मैद्याची खळ, कोळशाची पावडर ह्यांच्या मिश्रणापासून शाई तयार करतात. ही शाई सुरूवातीला ओली असते. ती पुडीच्या मध्यभागी बसवलेली असते. शाईचे एकावर एक असे पातळ थर दगडाच्या मऊ ट्याने घासून बसवितात. दगडाच्या घर्षणाने ओली शाई वाळते व सरस किंवा
मैद्याच्या खळीमुळे ती पुडीवर घट्ट चिटकुन बसते. शाईमुळे तबला एका सुरात होण्यास मदत होते. शाईचा थर पातळ असेल तर तबला उंच स्वरात लागतो. शाईचा थर जाड असेल तर तबला खालच्या स्वरात लागतो.
4) लव
शाईच्या व चाटीच्या मध्ये एक इंच रुंदीची जी गोलाकार पट्टी असते ति लव असे म्हणतात.
5) चाट:
लवेच्या बाजूला एक इंच रुंदीची जी गोलाकार पट्टी असते तिला चाट किंवा किनार असे म्हणतात.
६) गजरा
पुडीला गोलाकार बाजूने गुंफून ठेवण्यासाठी गजरा केलेला असतो. हा गजरा चामड्याच्या वादीपासून केलेला असतो. हा सुंदर दिसावा यासाठी वादीबरोबरच प्लॅस्टिकच्या पातळ पट्टीचा वापर केलेला असतो. यावर १६ घरे व ६४ छिद्रे असतात. याच्या १६ छिद्रांतून वादी ओवलेली असते.
7) वादी:
पुडी तबल्याच्या मुखावरून हालू नये यासाठी गजन्याच्या छिद्रातून जी चामड्याची लांब पट्टी ओवलेली असते त्यास वादी असे म्हणतात. ही वादी गट्ट्यावरून तबल्याच्या तळाशी असलेल्या गुडरीला व पुन्हा वर गजऱ्यात अशा प्रकारे वरखाली गुंफलेली असते. ही वादी अखंड असते.
८) गट्ठे :
तीन इंच लांबीचे व एक इंच जाडीचे दंडगोलाकार गठ्ठे हे तबल्याच्या पुडीवरील ताण कमी अधिक करण्यासाठी वापरले जातात. हे गठ्ठे वादीखाली दबलेले असतात. तबल्याला ८ गठ्ठे असतात.
9 )गुडरी:
तबल्याच्या तळाशी वादीपासून किंवा लोखंडाच्या सळईपासून एक कडे तयार केलेले असते. त्यास गुडरी असे म्हणतात. गुडरीतून वादी गजन्यात ओवली जाते व गजन्यातून पुन्हा गुडरीत ओवली जाते. यामुळे पुडीवरील ताण कायम राहतो. तसेच गुडरीमुळे तबला चुंबळीवरून हालत नाही.
ब) डग्गा :
१) भांडे :
डग्ग्याचे भांडे हे पितळ, तांबे व लोखंड इ. धातूपासून बनवलेले असते. यावर वातावरणाचा परिणाम होऊ नये यासाठी या भांड्याच्या बाहेरील बाजूने इलेक्ट्रो पेंटिंग (स्टीलचे पॉलिश) केलेले असते. हे भांडे अर्धगोलाकार असून आतील बाजूने पोकळ असते. कधी कधी हे भांडे लाकूड व मातीपासूनही तयार केलेले असते. हा डग्गा तीन आकारात असतो.
(१) मोठ्या आकाराचा २) मध्यम आकाराचा
३) लहान आकाराचा
2) पुडी :
तबल्याप्रमाणेच याचीही पुडी असते, जी भांड्याच्या मुखावर मढवलेली असते. यावर शाई, मैदान व चाट इत्यादि अंगे असतात.
३) शाई : ज्याप्रमाणे तबल्यावर शाई असते तशीच शाई डग्ग्याच्या पुडीवर बसवतात. परंतु ही शाई तबल्याप्रमाणे पुडीच्या मध्यभागी न लावता एका बाजूने लावलेली असते
४) मैदान : तबल्यामध्ये लव असते तर डग्ग्यावरील लवेच्या भागाला मैदान असे म्हणतात. कदाचित तबल्याच्या लवेपेक्षा डग्ग्याची लव अधिक पसरट असल्यामुळे याला मैदान म्हणता
५) गजरा : वादी व प्लॅस्टिकच्या पातळ पट्टीचा वापर करून हा गजरा तयार केलेला असतो. यातूनच वादी ओवलेली अस
६) वादी: पुडीवरील ताण कायम ठेवण्यासाठी वादीचा उपयोग होतो. काही वेळा वादीऐवजी दोरीचा प्रयोग केला जातो
७) गुडरी : तबल्याप्रमाणेच डग्ग्याच्या तळाशी लोखंडी कडी किंवा चामड्यापासून एक कडे तयार केलेले असते त्यालाच गुडरी असे म्हणता
८) गादी : ऊन, वारा व पावसापासून पुडीचे संरक्षण व्हावे यासाठी तबल्यावर व डग्ग्यावर एक गादी बांधलेली असते. ही गादी कापसापासून तयार केलेली असते. ही तबल्याच्या व डग्ग्याच्या पुडीवर बसावी यासाठी तिला कपड्याचे बंध केले असता
९) चुंबळ : तबला व डग्ग्याची जोडी हव्या त्या स्थितीत बसण्यासाठी चुंबळीचा उपयोग केला जातो. ही चुंबळ कापडी पिशवीमध्ये कापूस किंवा मऊ गवत.. घालून तयार केलेली असते. तबला चुंबळीवर ठेऊन वाजविल्यामुळे तबल्यातून अपेक्षित नादध्वनी निर्माण होते.
☺️ धन्यवाद.........

Comments
Post a Comment